आभा व आयुष्यमान भारत शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद !

Uran Vachanalay
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
जायंट्स ग्रुप ऑफ उरण ,श्री समर्थकृपा स्वंयसहायता संस्था  आणि गोपाळकृष्ण वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणुन शासकिय सहकार्य योजनेतुन आभा कार्ड,आयुष्यमान भारत कार्ड योजना,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शिबीर घेण्यात आले.
जायंट्सच्या अध्यक्षा संगिता सचिन ढेरे,वाचनालयाचे अध्यक्ष ऍड.पराग म्हात्रे,श्री समर्थ कृपा सखी स्वयं संस्थेच्या उपाध्यक्षा मंजुकुमार,तसेच जायंट्स ग्रुपच्या फेड वन-बी च्या काॅन्सिल मेंबर प्रियंवदा भि.तांबोटकर,पास प्रेसिडेंन्ट विनायक पै, उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रतिभा भालेराव, ऍड वोकेट वर्षा पाठारे ,माजी अध्यक्ष देवेद्र पिंपळे ,उपाध्यक्ष योगेश म्हात्रे.कार्यकारणी सदस्य आनंद ठक्कर,तृप्ती भोईर, श्री समर्थ कृपा सखी संस्थेच्या सचिव कविता म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते राजेश शहा तसेच वाचनालयाचे कर्मचारी  जिजा घरत,अवनी चोरगे उपस्थित होते.अर्चना चोरगे, मनाली कांबळे, वृषाली पवार आदी सदस्यांनी नागरिकांना आभा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले.एकुण १२४ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
हा समाजउपयोगी उपक्रम मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादात यशस्वी रित्या पार पडला.सर्वांचे मोगर्‍याची रोपे व तुळशीची रोपे देऊन सत्कार करण्यात आले.सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ उरण ,श्री समर्थकृपा स्वंयसहायता संस्था आणि गोपाळकृष्ण वाचनालयच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading