आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने पेण प्रांत कार्यालयावर धडकणार

Pen Prant
पेण ( राजेश प्रधान ) :
पेण तालुक्यातील आदिवासींना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आदिवासींसाठी मंजूर केलेल्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच शाहपाडा कधरणवाडीला गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
 तालुक्यातील आदिवासीबांधव ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी पेण प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. दुष्मि-खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी, वडमालवाडी येथील बेकायदेशीर दगड खाणी बंद करून आदिवासी वाड्यांचे रस्ते बनविणे, हेही मागण्यांमध्ये समाविष्ट आहे.
 तालुक्यातील उंबरमाळ, खौसावाडी, काजुचीवाडी, केळीचीवाडी, तांबडी, माळवाडी येथील आदिवासी वाड्यांचे रस्ते बनवण्यासाठी जानेवारी महिन्यात काम मंजूर करून वर्क ऑर्डर देण्यात आली होती, परंतु दहा महिन्यानंतरही काम सुरू झालेले नाही. स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षे उलटूनही या वाड्यांपर्यंत पिण्याचे पाणी आणि रस्ते पोहोचले नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
   अशा आहेत मागण्या 
  १) खवसावाडीच्या रस्त्यासाठी वापरलेले सुमारे ६० लाख रुपयांचा रस्ता शोधून द्या, अन्यथा चौकशी करून संबंधित ठेकेदार व राजिप बांधकाम अभियंत्यांवर कारवाई करावी.
२) पेण ते उंबरमाळ, केळीची वाडी ह्या रस्त्यास मंजूर ३० लाख रुपये निधीची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि राजिप अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
३ ) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर पेण ते खवसावाडी ह्या रस्त्याचे कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून कारवाई करावी.
४) पाचही आदिवासी वाड्यांना वन हक्क कायदा २००६ अन्वये ३/१ वैयक्तीक व ३/२ नुसार सार्वजनिक जमिनीसाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे. 
५) उंबरमाळ येथे समाज मंदिर व अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावे.
६) वरची तांबडी येथे समाज मंदिर व सभा मंडप बांधण्यात यावे.
७) वरची तांबडी,खालची तांबडी आणि खवसावाडी येथे अंतर्गत रस्ते बनविण्यात यावे. 
८) पेण तहसील मध्ये ३५० आदिवासींचे प्रलंबित असलेले जातीचे दाखले मंजूर करण्यात यावे.
 ९)आदिवासीवाडी उंबरमाळ  जि.प.प्राथमीक शाळेची धोकादाय झालेली ईमारत तात्काळदुरुस्ती करण्यात यावी.
१०) ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि-खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी, वडमालवाडी आदिवासी वाडीलां लागून असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी बंद करून दोन्ही वाड्यांचे रस्ते बनविणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading