
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
गांधी जयंतीच्या औचित्याने खारपाडा गावात एक अनोखा अनावरण सोहळा पार पडला. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून साकारलेले “आपला खारपाडा” या नवीन विद्युत रोषणाईने सजलेल्या नामफलकाचा उद्घाटन सोहळा गावातील शिवस्मारक वाचनालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
या सोहळ्यास खारपाडा गावचे सरपंच नेत्राताई घरत, उपसरपंच संजय घरत, आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
या नामफलक निर्मितीमागे राजू मुंबईकर यांचे औदार्य असून, खारपाडा गावाच्या सौंदर्य व विकासाला नवी ओळख देण्यासाठी या नामफलकाचे अनावरण महेशदादा घरत आणि संजयदादा घरत यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच गावाच्या विकासात सतत योगदान देण्याचे वचन दिले.
कार्यक्रमास गावातील महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, ज्यामुळे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
