नागोठणे पोलिस ठाण्यात शुक्रवार 04 एप्रिल रोजी आगामी येणारी श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज पालखी तसेच हजरत मिरा मोहिद्दीन शाहाबाबा यांचा उरूस या अनुषंगाने पोलिस ठाण्याचे सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत आपण सारे भगवंताचे लेकरे असून सण,उत्सवाचे पावित्र्य राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन सहा. पो.नि.सचिन कुलकर्णी यांनी केले.
यावेळी सरपंच सुप्रिया संजय महाडिक, श्री जोगेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र जैन,सचिव दिलीपभाई टके, मा.सरपंच डॉ.मिलिंद धात्रक,उपसरपंच अकलाक पानसरे,ग्रा.प.सदस्य- ज्ञानेश्वर साळुंखे व ॲड.प्रकाश कांबळे, ग्रा.प.सदस्या- अमृता महाडिक,उत्सव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत ताडकर,उरूस कमिटी अध्यक्ष गुलजार सिंधी यांच्यासह मोहन नागोठणेकर, बाळासाहेब टके, सिराज पानसरे,संतोष चितळकर, जितेंद्र कजबजे, अनिल पवार,पांडुरंग कोळी,दिगंबर खराडे, राजा गुरव, असपाक पानसरे,आसिफ मुल्ला,रोहिदास हातनोलकर,अनिल महाडीक,सुदर्शन कोटकर,बाबा मुल्ला,हुसेन पठाण,सज्जाद पानसरे, मंजर जुईकर,सिद्धेश महाडिक पोलिस ठाण्याचे विनोद पाटील व स्वप्नील भालेराव यांच्यासह विभागातील नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलकर्णी यांनी सांगितले की, आपण सारे भगवंताचे लेकरे असून सण,उत्सवाचे पावित्र्य राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.त्यासाठी आगामी काळात येणारे पालखी व उरूसासाठी लागणारे परवाने संबंधित खात्याकडून घेणे बंधनकारक आहे.
पालखी – पालखीच्या मार्गाचे व्यवस्थित नियोजन करा, कायदा सुव्यवस्था व शिस्त महत्वाची असून कोणीही नशापान करणार नाही, केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, पालखीत पारंपारिक वाद्य वाजवावीत, पालखी बरोबर सदस्यांनी हजर राहावे, पालखी एकाच ठिकाणी उभी न राहता लवकरात लवकर मंदिरात येईल यासाठी प्रयत्न करणे, वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घेणे.
उरूस – उरूस परिसरात नागरिक मदत कक्ष स्थापन करणे, पुरेशी लाईट व जनरेटरची व्यवस्था करणे, विविध सूचना देण्यासाठी स्पीकरची व्यवस्था करणे, खाद्य व इतर दुकाने रस्त्यामधील व्यवस्थित अंतर ठेवून बसविणे, दुकानांना कायदेशीरच लाईट व्यवस्था करणे,आपत्कालीन व्यवस्था म्हणून रुग्णवाहिका व अग्निशामक वाहन ठेवणे, वाहनासाठी बोर्ड लाऊन पार्किंग व्यवस्था करणे.
आदर्श सदस्यांचा पुरस्कारासह होणार सन्मान – या काळात पालखी व उरूस कमिटी मधील जे सदस्य चांगले कार्य करतील त्यातील प्रत्येकी पाच पाच सदस्यांचा प्रशस्ती पत्रक व रोख रक्कमेचे बक्षीस तसेच आदर्श पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.
नागोठणे हे आदर्श शहर म्हणून असलेले परिसरातील नाव अबाधित ठेवा,पालखी व उरूसात प्रत्येकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी,कमिटीच्या प्रत्येक पदाधिकारी व सदस्यांनी अधिकृत ओळख पत्र गळ्यात अडविणे, कोणीही नाशापान करणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल व त्यास कुणीही अडथळा आणू नये, तसेच कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाहीत त्याची जबाबदारी दोन्ही उत्सव कमिटीची राहील, यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी,कोणतीही अडचण आल्यास आम्ही आपल्या सोबत 24 तास असल्याचे कुलकर्णी यांनी सांगून एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी उपस्थितांना केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार विनोद पाटील यांनी मानले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.