कोकणासह महाराष्ट्रातील गावा-गावातले रस्ते होणार चकाचक, MSIDC चा प्लॅन रेडी

Road Cement
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच राज्य महामार्ग आणि जिल्हा रस्तेही सिमेंट काँक्रीटचे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत हा प्रकल्प राबवला जात असून, 6,000 किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते तयार करण्यासाठी 37,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी 2025 पासून 34 जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू होईल आणि तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. राज्य महामार्ग तसेच उच्च वाहतूक असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाईल. सध्या खराब स्थितीत असलेल्या रस्त्यांमुळे प्रवाशांना अनेक अडचणी येतात, त्यामुळे हा प्रकल्प वाहतुकीला गती देऊन आर्थिक विकासाला चालना देईल.
हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलद्वारे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्य सरकार 30% निधी देणार असून, उर्वरित निधी MSIDC कर्ज स्वरूपात उभा करेल. सर्वाधिक 1,330 किमी रस्ते पुणे विभागात तयार केले जातील, तर नाशिक, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading