आता आधार कार्डसंबंधीत नवा नियम लागू, लाडक्या बहीणींसह नागरिकांची डोकेदुखी वाढणार?

Adhar

मुंबई : 

सध्या आपल्या देशात आधार कार्ड ला खूप महत्व आहे. अगदी शाळेच्या प्रवेशापासून ते मोबाइल सिमकार्ड, तसेच सरकारी योजनेच्या लाभांपर्यंत सगळीकडे आधार कार्ड देणं अनिवार्य असतं
परंतु आता मात्र आधार कार्डावर कोणतेही तपशील बदलायचे असतील तर त्या प्रक्रियेत सरकारकडून यावेळी बदल करण्यात आले आहेत. ‘यूआयडीएआय आधार कार्ड डॉट कॉम’ने याबाबतची माहिती दिली आहे.
भारत सरकारने आधार कार्डविषयक नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आधार कार्डावरचं नाव आणि जन्मतारीख यात बदल करणं आता आणखी अवघड झालं आहे. पूर्वी आधार कार्डवर नाव आणि जन्मतारीख बदलणं सहज शक्य होतं. आता ती प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे ज्यांचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्डावर नोंदवताना काही चूक झाली आहे, त्यांच्यासाठी ती चूक सुधारणं डोकेदुखी ठरणार आहे.
यापुढे आधार कार्डावरची जन्मतारीख किंवा नाव चुकलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. यापूर्वी असं कोणतंही कागदपत्र न सादर करताही अशा चुका दुरुस्त करता येत असत. आता नियम कडक करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात अनेक महिलांकडे जन्माचा दाखला किंवा स्कूल सर्टिफिकेट नसण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्यांना आधार कार्डावरची माहिती अपडेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट नाही त्यांच्यासाठी आधार कार्डावरची माहिती अपडेट करणं ही डोकेदुखी ठरणार आहे. त्यांना एमबीबीएस डॉक्टरने अटेस्टेड केलेलं पत्र किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याने अटेस्टेड केलेलं पत्र जोडणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रं नाहीत त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे ते काढणं किंवा त्यात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणं ही प्रक्रिया सहज सोपी असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ते अत्यंत क्लिष्ट आहे. नव्या नियमांमुळे त्या क्लिष्टतेत भरच पडली आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. तुमच्या आधार कार्डावरचे तपशील बरोबर आहेत का? नसतील तर ते बदलण्यासाठी आता नवे नियम लागू झाल्यामुळे बरीच यातायात करावी लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading