सोने-चांदी, पैसे, हिरे,गाडी किंवा इतर महागड्या वस्तुंची चोरी झाल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. पण महाड शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. सदर कपडे चोरणारा हा मनोरुग असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर परिसरात मनोरुग्ण इसम हा महिलांचे कपडे चोरण्याचा प्रकार सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलांचे कपडे चोरणारा निलेश इल्या बाळा एनकर हा मनोरुग्ण असल्याची माहिती महाड शहर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
महिलांचे कपडे चोरी केल्या प्रकरणी निलेश इल्या बाळा एनकर ह्या मनोरुग्ण इसमास अटक करण्यात आली आहे. महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर परिसरातील ही घटना आहे.
गेल्या सहा महिन्यापासून आवारात वाळत टाकलेले महिलेचे कपडे रात्रीच्या वेळी अचानक गायब होत होते. हे कपडे अचानक गायब कसे होतात असा प्रश्न प्रदीप अनंत सोंडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. या घटनेचा याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सीसीटीव्ही फुटेज बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला.
महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 305 (b) कलमाप्रमाणे किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत.
निलेश इल्या बाळा एनकर असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर येथे राहणारा असून याला काही मानसिक त्रास असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्रीच्या वेळी महिलांचे कपडे चोरायचा फेकून द्यायचा. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तपासणी करणार आहोत असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.