मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ध्यानाकर्षण शांतीपूर्ण आंदोलन आझाद मैदान-मुंबई येथे होत असून सर्व ईपीएस-९५ पेन्शनधारक बंधु-भगिनींना यांनी आपल्या मागणीसाठी यात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली आठ ते नऊ वर्षांपासून ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत पेन्शनरांच्या कल्याणासाठीच रात्रंदिवस लढा सुरू आहे. सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रांतील विविध आयुधांचा वापर करून विविध माध्यमांतून आजपर्यंत आंदोलनं केली तसेच तहह्यात आंदोलने चालू आहेत. यासाठी संबधीत भेटीगाठी,पत्रव्यवहार करूनही अद्याप फक्त आश्वासनांव्यतिरिक्त पदरात काहीच पडले नसल्याने आता विधानसभेची निवडणूक आचार संहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे विधानसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी केंद्र सरकारकडून तातडीने ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठीच १ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११वाजता ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे आझाद मैदान-मुंबई येथे शांतीपूर्ण ध्यानाकर्षण आंदोलन करण्याचे जाहीर करण्यांत आले आहे.
हे आंदोलन अखेरचे आंदोलन ठरण्यासाठी ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे. तरी इपीएस् ९५ व ईपीएफओ क्षेत्रीय कार्यालयाशी सलग्न असलेल्या औद्योगिक,सहकारी संस्था, महामंडळ, सहकारी बँका,सहकारी उद्योगधंदे आणि खाजगी क्षेत्रातील आस्थापनेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक११वाजता आझाद- मैदान मुंबई येथे शांतीपूर्ण ध्यानाकर्षण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष कमांडर राऊत यांनी केले आहे.
सदरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होवून आपले बहुमुल्य योगदान देवून लढा यशस्वी होण्यासाठीच सिंहाचा वाटा उचलून मोलाची कामगिरी करावी.या क्षेत्रीय कार्यालयाशी आवर्जून सहभागी होवून लढा तीव्र करण्यास सहकार्य करावे. आता नाही तर कधीच नाही यासाठी अधिक सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष राऊत यांनी केले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.