पती बरोबर झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन त्याची पत्नी तीन मुलांसह घरात कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने त्यांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीच्या पाठीमागे मनपाच्या शौचालय येथे राहणारे बिकुलकुमार साव यांचे त्यांची पत्नी मधुदेवी बिकुलकुमार साव (26) यांच्याबरोबर किरकोळ भांडण झाले. त्यामुळे बिकुलकुमार हा त्याच्या मुळगावी बिहार येथे गेला असताना मधुदेवी हिने तिचा 7 वर्षीय मुलगा रितीक, 5 वर्षीय मुलगा रिधान व 2 वर्षीय मुलगी परि या तिघांना घेवून ती कुठेतरी निघून गेल्याने हे तिघे हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.नि.हनुमंत आहिरे यांच्याशी संपर्क साधावा.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.