आई डे केअर संस्थेला सॅनडोझ प्रा. लि.कडून मिळालेल्या नव्या बसचे उद्घाटन 

Aai Day Care School Ramwadi
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
सॅनडोझ प्रा. लि. या औषधनिर्माण क्षेत्रातील विख्यात बहुराष्ट्रीय कंपनीच्या असाधारण दातृत्वामुळे पेण येथील आई डे केअर संस्थेला नवी ४१ आसनी स्कूल बसची देणगी प्राप्त झाली आहे. ही संस्था रामवाडी – पेण येथे बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी विना अनुदानित निवासी शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविते.
 देणगीदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुधीर भंडारी (डायरेक्टर सीएसआर हेड सँडोज कंपनी), पंकज गुप्ते (जनरल मॅनेजर सॅनडोज कंपनी), अमित जांभळे (सीनियर मॅनेजर सॅनडोज कंपनी) यांच्या शुभेच्छांनी व हस्ते, तसेच श्रीमती शोभा मूर्ती (आरंभ संस्थेच्या फाउंडर ट्रस्टी) व मधुबाला निकम (रोटरी क्लब ऑफ पेणच्या माजी अध्यक्षा) यांच्या उपस्थितीत उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
रोटरी क्लब ऑफ पेणच्या माजी अध्यक्षा मधुबाला निकम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही देणगी मिळविणे शक्य झाले असे संस्थेच्या संस्थापक स्वाती मोहिते यांनी नमूद केले. उदघाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा  प्रेमलता पाटील, सचिव ऍड. सतीश म्हात्रे, अन्य विश्वस्त, संस्थेचे हितचिंतक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे ११ वर्षे खेडोपाडी, खराब रस्त्यांवर सेवा देऊन जीर्ण झालेल्या बसऐवजी नव्या प्रशस्त आरामदायी बसने प्रवास करता येणार याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडत होता. संस्थेचे संस्थापक महेंद्र मोहिते यांनी देणगीदार कंपनीला मनःपूर्वक धन्यवाद दिले. संस्थेचे कार्य पाहून भारावून गेल्याची भावना प्रकट करून कंपनी सदैव हर तऱ्हेने मदत करेल असे आश्वासन गुप्ते यांनी दिले.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading