आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळल्यानंतर रातोरात रस्ता वाहतूकीसाठी पूर्ववत

Ambenali Ghat Land Slide

पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 

तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानंतर चिरेखिंड धनगरवाडीतील डोंगरामधून ओढयासारखा पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि लाल मातीचे ढिगारे तसेच मोठमोठया आकाराचे दगड घाटरस्त्यामध्ये आले. यावेळी आपत्तीनिवारण आणि व्यवस्थापन प्रमुख तसेच पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे यांनी घाटरस्त्याची वाहतूक तात्पुरती बंद ठेवली.  दरम्यान, प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आंबेनळी घाटरस्त्यामध्ये आलेले मोठे दगड बाजूला करून ओढासदृश्य पाण्याचा लोट दरीकडे जाण्यासाठी वाट निर्माण करून दिली.
पोलादपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळया भागातील पर्जन्यमान वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास चिरेखिंड धनगरवाडीतील जॅकवेल तसेच लगतच्या ओढयातून मोठया प्रमाणात पावसाच्या पाण्याचा प्रवाह आंबेनळी घाटरस्त्यावर आल्याने या प्रवाहासोबत मोठमोठे दगड तसेच लालमातीचे ढिगारेदेखील रस्त्यावर आले. रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने घाटातून जाणाऱ्या वाहनांना अतिशय जिकिरीने मार्ग काढावा लागत असल्याचे पाहून प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आंबेनळी घाटरस्त्यामध्ये आलेले मोठे दगड बाजूला करून ओढासदृश्य पाण्याचा लोट दरीकडे जाण्यासाठी वाट निर्माण करून दिली. मात्र, यामुळे आंबेनळी घाटातील रस्ता रात्रीच्यावेळी वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याचे लक्षात घेऊन आपत्तीनिवारण आणि व्यवस्थापन प्रमुख तसेच पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे यांनी घाटरस्त्याची वाहतूक तात्पुरती बंद ठेवली.
सकाळी सुर्योदयासोबतच आंबेनळी घाटातून जाणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर रस्त्याची स्थिती लक्षात घेऊन वाहतुकीसाठी रस्ता पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलादपूरचे मंडल अधिकारी राठोड तसेच अव्वल कारकून मंगेश ढेबे तसेच तलाठी यांनी चिरेखिंड धनगरवाडीतील ओढा व जॅकवेल परिसरातील दगड आणि लालमातीचे ढिगारे यांची पाहणी करून ग्रामस्थांना अतिवृष्टीकाळात धोका संभवणार नसल्याची खात्री करून पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडे अहवाल सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading