दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी होरीझॉन बँक्वेट हॉल, खडतल ब्रिज, अलिबाग-रेवस रोड, रायगड, महाराष्ट्र येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजक क्योशी राहुल एस. तावडे होते. या कराटे स्पर्धेमध्ये एकूण 560 मुलांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत कवळे यांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये सांबरी येथील रहिवासी व जनरल अरुकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग येथील विद्यार्थी दर्पण याने उत्कृष्ट कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले आहे.
दर्पणच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या कर्तृत्वाने अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.