अॅड. दत्ता पाटील काॅलेज आॅफ लाॅ, इंडिया ईलाईट एज्यूकेशन आणी इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स अॅवाॅर्ड व एक्सलन्स इन एज्यूकेशनल स्टँडर्ड अॅडॅप्टॅबिलीटी अँड ईंप्लीमेंटेशन पुरस्काराने सन्मानित
०२ ऑगस्ट २००० साली सुरू झालेले रायगड जिल्ह्यातील पहिले लॉ कॉलेज म्हणजेच ॲड दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ यावर्षी २५वे वर्ष साजरे करत आहे. या रौप्यमहोत्स्वी वर्षात लॉ कॉलेजला NAAC च्या पहिल्या cycle मध्ये “B” ग्रेड तर मिळालीच पण आज रोजी India Elite Education & Institutional Excellence Awards & Conference 2024 , National Edition यांच्या तर्फे देण्यात येणारे “Outstanding & Trusted Law College of the Year 2024” Maharashtra Award under “Quality Education ,Excellent Administration & Social Contribution” Category for the year 2024. तसेच “Excellence In Educational Standards Adaptability & Implementation” हे दोन मानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
सदरहू पुरस्कारांचे वितरण २५/१०/२०२४ रोजी बेंगळुरू येथील The Grand Ballroom , Taj West End या पंचतारांकीत हॉटेल मध्ये पद्मश्री. डॉ.सि.आर चंद्रशेखर व पद्मश्री डॉ.गोपालन शंकर यांच्या हस्ते पार पडले. जनता शिक्षण मंडळाचे तथा ॲड दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ चे अध्यक्ष ॲड गौतम पाटील , उपाध्यक्षा डॉ साक्षी पाटील व लॉ कॉलेजच्या प्राचार्या ॲड निलम हजारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या निमित्ताने अध्यक्ष ॲड गौतम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विनाअनुदानित लॉ कॉलेज चालवणे मेहनतीचे व अडचणीचे काम असते परंतू एखाद्या कोचला जसा संघ नायक हवा असतो तसा प्राचार्य ॲड निलम हजारे यांच्या रूपाने मला मिळाला असून टीम मधील सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेवून मी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून त्यांनी आपण खरे खुरे टीम लिडर आहोत हे हा पुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल लॉ कॉलेजचे सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यांनी आनंदोत्सव साजरा केला. समाजातील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती , वकील वर्ग तसेच पालक यांनी कॉलेज व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.