अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडिया विमान कोसळले; 242 जणांचा मृत्यू , सुनील तटकरेंच्या कुटुंबावर शोककळा

Ahmadabad plane crash
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
गुरुवारचा दिवस अत्यंत दुःखद ठरला. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-171 हे बोइंग 787 ड्रीमलाइनर विमान टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. या अपघातात 242 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या विमानात 2 वैमानिक, 10 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. यात दोन मराठी महिलांचा समावेश होता – मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच सुनील तटकरे हे तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले.
✈️ प्रवाशांचा तपशील:
  • भारतीय नागरिक: 169
  • ब्रिटीश नागरिक: 53
  • पोर्तुगाली नागरिक: 7
  • कॅनडाचा प्रवासी: 1
🛑 विमानसेवा बंद:
अपघातानंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले. यामुळे अहमदाबाद-नागपूर दरम्यानची गुरुवारी रात्री 9.25 वाजता जाणारी आणि संध्याकाळी 6.55 वाजता येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली. नागपूरच्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
🔍 अपघाताची चौकशी:
AI-171 विमानाने 13.39 वाजता टेक ऑफ केलं होतं आणि काही मिनिटांतच कोसळलं. ‘मेडे’ कॉल मिळाल्यानंतर विमानाशी संपर्क तुटला. या दुर्घटनेची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने चौकशी सुरू केली असून नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
मुख्य पायलट सुमित सभरवाल यांच्याकडे 8200 तासांचा अनुभव होता, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्याकडे 1100 तासांचा अनुभव होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading