पनवेल शहर परिसरातून रिक्षा चोरी करणार्या चोरट्यास अवघ्या 24 तासात पनवेल शहर पोलिसांनी रिक्षासह ताब्यात घेतले आहे.
स्वप्नील पवार यांनी त्यांची रिक्षा क्र.एमएच-46-बीडी-0834 ही दर्ग्यासमोरील शाळेजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली होती.
या तक्रारीनंतर पनवेल पोलिस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर रिक्षाचा शोध घेत असताना ही रिक्षा कर्नाळा स्पोर्टस् अॅकॅडमी परिसरात उभी असल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने तेथे जावून सापळा रचून आरोपी मुस्तकीन खान (32 रा.पनवेल) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.