अवकाळी पावसाच्या सरीनं महाड आगारात चिखलाचं साम्राज्य!

Mahad Agar
महाड (मिलिंद माने) :
अवकाळी पावसाच्या सरीने महाड एसटी आगारात चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे या चिखलाच्या पाण्यामुळे मात्र एसटी आगारात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मात्र या चिखलाचा प्रसाद मिळाल्याने अनेक प्रवाशांनी एसटी महामंडळाला व आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
महाड एसटी आगारात लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या स्थानकाच्या गाड्या ज्या फलाटावर उभे राहतात त्या ठिकाणचा परिसर कॉंक्रिटीकरण करण्यात आला. मात्र त्यामुळे एसटी आगारातील वाहतूक नियंत्रण चौकी ते प्रवासी बसण्याच्या ठिकाणी असणाऱ्या उतारामुळे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाच्या सरींमुळे सर्व पाणी एकाच ठिकाणी साचून राहिले आगारातील पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने ऐन उन्हाळ्यात आगारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती तर पावसाळ्यात महाड आगाराची काय परिस्थिती होईल असा सवाल अनेक प्रवासी महाड आगार व्यवस्थापनाला विचारीत आहेत.
ठेकेदारामुळे प्रवाशांना मनस्ताप भोगाव लागत आहे!
महाड एसटी आगारामध्ये काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला राजकीय पक्षाच्या नेत्याचं अभय असल्यामुळे व एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाचे न ऐकता मनमानीप्रमाणे काँक्रीट करण्याचे काम करणाऱ्या या ठेकेदारामुळेच महाड एसटी आगाराला अवकाळी पावसाच्या पहिल्याच सरीत चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता एसटी महामंडळ यावर ठेकेदारावर कारवाई करते की राजकीय पुढाऱ्याच्या दबावामुळे ठेकेदारावर कारवाई होण्याऐवजी प्रवाशांना चिखलाच्या मनस्तापला सामोरे जावे लागते हे येणाऱ्या पावसाळी काळात स्पष्ट होईल.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading