
कर्जत ( गणेश पवार ) :
कर्जत तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. २२ वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिकसंबंध करीत असतानाचे तिच्या न कळत मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान याबाबत पीडितेच्या कुटुंबाकडून नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील अती दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खांडस येथे राहणारा आरोपी तरुण अक्षय दशरथ ऐंनकर या तरुणाने पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केला आहे. तर पीडित मुली सोबत अक्षयने सुरुवातीला प्रेमाचे नाटक करीत तिला तुझे वय १८ वर्षे पूर्ण झाले की आपण लग्न करू असे अमिष दाखवले होते.
दरम्यान गेली दोन वर्षे पीडित तरुणी सोबत प्रेमाचे नाटक करीत असताना आरोपी अक्षय याने पीडित मुलीला मार्च २०२३ मध्ये आपल्या घरी तसेच शेजारील बंद घरात कोणीही नसताना सुरुवातीला भेटण्यासाठी बोलवले होते, तर अक्षय हा शारीरिक सबंधासाठी पीडित मुलीला धमकावत तू माझ्यासोबत शरीरसंबंध केले नाहीत तर तुझ्या आई वडिलांना मी ठार मारीन अशी धमकी देत होता. घाबरून गेलेल्या पिडीते सोबत बळजबरी करीत अक्षय याने अखेर सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावून अत्याचार करीत असताना आरोपी अक्षय याने आपल्या मोबाईल मध्ये पिडित मुलीच्या नकळत व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने व ही बाब समोर येताच पीडित मुलीच्या कुटुंबाकडून नेरळ पोलिस ठाण्यात धाव घेत अक्षय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पीडित मुलीने आपली फसवणुक करीत आपल्यावर केलेल्या अत्याचाराची माहिती नेरळ पोलिसांना दिली असता, अक्षय ऐंनकर याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर.२४३/२०२४ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण पोक्सो (POCSO)अधिनियम, २०१२ चे कलम ४,६,१४ व १५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४,६४ (२) (आय) (२) (आय),64,64(2)(आय),(एम) माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत. सदर गुन्ह्या प्रकरणी आरोपी अक्षय दशरथ ऐंनकर याला नेरळ पोलीसांनी अटक केली आहे.
दरम्यान अक्षय याने अन्य काही मुलींची देखील फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. तर कर्जत तालुक्यात या घटनेनंतर खळबळ माजली असून, तालुक्यात गेल्या काही महिन्यात अशा घटना सतत कानांवर येत असल्याने, कर्जत तालुक्यात बाल लैंगिक अत्याचार बाबत जनजागृती करणे गरजेचे बनले असून यावर कठोर कारवाई देखील होणे तेवढेच महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.