या कलियुगात माणूस क्षणिक सुखासाठी कोणत्या थरापर्यंत जाईल याचा काहीच नेम राहिला नाही, यामध्ये लहान-मोठे, उच-नीच, जात-धर्म, नाते-गोते, अशा कशाचेच तारतम्य व सामाजिक भान यामध्ये पाळले जात नाही. वासनेच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करून स्वतःचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य उध्वस्त करत असतात. असे म्हणतात की, हा प्रेम म्हणजे एक प्रकारचा आंधळं, मुकं, बहिर असणार ज्याला काहीच संवेदना नसलेला प्रेम करतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे मागील रविवार दि. ३१ मार्च रोजी अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरुन जन्मदात्या आईनेच दोन पोटच्या लेकरांचा गळा दाबून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील किहीम येथे घडली आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी माता शितल सदानंद पोळे(वय २५) या महिलेला सोमवार दि.८ एप्रिल रोजी सायंकाळी ताब्यात घेतले आहे.
अनैतिक संबंधात पाच वर्षाची मुलगी आराध्या सदानंद पोळे व तीन वर्षाचा मुलगा सार्थक सदानंद पोळे ही दोन्ही मुले अडसर ठरत होती, म्हणून जन्मदात्या आईनेच केवळ प्रियकराच्या प्रेमापोटी व स्वतःच्या खुशीसाठी पती बाजारात गेल्याची संधी साधून नाक व तोंड दाबून पोटच्या लेकरांचा जीव घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शितल सदानंद पोळे, मुळगाव पुसद- जि. यवतमाळ हिचे आपल्या गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता. मात्र, ही दोन्ही मुले अडसर ठरत होती. प्रियकराला मुले नको होती. अशातच मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचे वडिलांना सांगत होती. अखेर शितलने रविवार दि. ३१ मार्च रोजी संध्याकाळच्या वेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर गमजा बांधून तसेच हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला. यानंतर तिने स्वतःच मोठ्या शिताफिने मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला.
या लहान बालकांच्या मृत्यूवर संशय निर्माण झाल्याने त्यांचा विसेरा आणि शवविच्छेदन करुन सोमवार, दि. १ एप्रिल रोजी करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले. या मुलांच्या पार्थिवावर अंतिम विधी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांच्या मूळगावी पुसद-यवतमाळ येथे घेऊन गेले. याचदरम्यान पोलीस कसून तपास करीत होते. गुन्हेगार कितीही चालाख असला तरी तो एखाद्या गोष्टीची चूक करतोच, याच केलेल्या चुकीचा एक धागा पकडून अर्थात सुतावरून पोलिसांनी स्वर्ग गाठलाच आणि चिमुकल्यांच्या मारेकऱ्यापर्यंत अलगद पोहोचले.
या घडलेल्या घटनेप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, प्रथम खबर फिर्याद देऊन मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र.४२/२०२४ कलम ३०२ भा. द. वी. गुन्हा नोंद करून आरोपी शितल सदानंद पोले, सध्या रा. शिक्षक कॉलनी, किहीम ता. अलिबाग, रायगड, मुळगाव बेलोरा, ता.पुसद,जि यवतमाळ, हिला अटक करण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रायगड यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा रायगड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, मपोह. अभियंती मोकल, मपोशी. जयश्री पळसकर तसेच मांडवा पोलीस ठाणेकडील तपास पथकातील प्रभारी सपोनि सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत, सफौ. सुदेश मारखंडे, पोह. वैभव पाटील, पोह. नवनाथ गावडे, पोना. अक्षय पाटील, मपोशी. चंचल शुक्ला, मपोशी. लक्ष्मी मेस्त्री, यांनी गुन्ह्याच्या तपासात कसून चौकशी करत गुन्ह्यात सामील आरोपीला पकडण्यात मोलाची कामगिरी केली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.