अलिबाग (अमुलकुमार जैन) :
तीन महिन्यापूर्वी कुर्ला स्टेशन बस डेपोमधून निघालेली इलेक्ट्रिक बस भरधाव वेगाने गर्दीत घुसली या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता तर वीस जण जखमी झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षांच्या तरुणीवर अत्याराच्या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडालेली घटना ताजी असतानाच आज रायगड जिल्ह्याचे मुख्यालयीन ठिकाण असलेल्या अलिबाग बस स्थानकाबाहेर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघात होवून या अपघातात एकवीस वर्षीय जयदीप शेखर बना याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अपघात स्थळी वरसोली येथील ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात संतप्त झाल्याने या अपघातानंतर वातावरण तणावपूर्वक बनले होते.
अलिबाग शहरात होंडा कंपनीची युनिकॉन दुचाकी आणि एसटी बसचा झालेल्या अपघातात विद्यार्थीचा जागीच मृत्यू झाला. जयदीप शेखर बना (वय २१वर्षे, रा. वरसोली ) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना दि.२७ रोजी सकाळी सकाळी अकराच्या सुमारास अपघाताची घटना घडली. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात डॉ. धनेशा आकाश राणे ( वय 24 वर्षे, वरसोली भवानी नाका, अलिबाग) यांनी योगेश रामभाऊ अडसूळ (राहणार – वेदचुर, तालुका – पाटोदा, जिल्हा बीड) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी शहरातील बस स्थानकासमोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस क्रमांक एम एच २०बीएल ३८०९ ही पनवेल पेण अलिबाग मागून येणाऱ्या एसटी बसची होंडा कंपनीची युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच ०६ बी वाय ५८६९ या दुचाकीला धडक बसली धडक बसली. पुढे अन्य एक एसटी बस होती. दोन गाड्यांमध्ये दुचाकी सापडली. तसेच एका प्रवासी रिक्षाला देखील ठोकर लागली आहे यात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर जमाव आक्रमक झाला होता. जमावाने एसटी बसची तोडफोड केली. यावेळी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही जमाव शांत झाला नाही.
अखेर पोलिस अधीक्षक सोमनाथ पाटील यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभितजित शिवथरे,यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे, पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल, मुरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोयनाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, अलिबाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने यांच्या सहित विविध पोलिस ठाण्यातून ज्यादा कुमक मागविल्याने अलिबाग एस टी बस स्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
स्वारगेट बसस्थानकात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षांच्या तरुणीवर अत्याराच्या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे.
अपघातामध्ये रिक्षाचेही नुकसान