अलिबागजवळील आक्षी येथील राकेश मारुती गण यांच्या बोटीला भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे भीषण आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले. बोटीवरील 18 खलाशांनी समुद्रात उड्या मारून जीव वाचवला.
या घटनेनंतर भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी गण कुटुंबीयांची भेट घेतली. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या साहाय्याने गण कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही भर दिला जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.