रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बनावट दस्तऐवज आधारे फसवणूक केल्याप्रकरणी महेश अनंत पाटील,(रा. मोठे शहापुर, ता.अलिबाग जि. रायगड) ,लहु कृष्णा पाटील (रा. आनंदनगर, कासु, ता.पेण, जि. रायगड) अनंत मोतीराम पाटील (रा. डोलवी, ता.पेण, जि.रायगड) यांच्याविरोधात सुभाष पांडुरंग बोलाडे,(वय-४६ वर्षे, व्यवसाय – खाजगी नोकरी रा महालुंगी, पो.वावंजे, ता. पनवेल, जि.रायगड ) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दिनांक २५/१०/२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास महेश पाटील,लहु पाटील, अनंत पाटील या तिघांनी व इतर इसमांनी कट रचुन स्वतःचा आथिक फायदा करुन घेण्याकरीता अमर मलाराम गेहलोत यांचे मालकीचे मौजे शहापुर,( ता.अलिबाग)येथील सर्व्हे नं.४७२/२ एकुण ४५.९० गुंठे हि जमीन मिळकत विक्री करण्याकरीता अमर मलाराम गेहलोत यांचे यांचे खोटे व बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, व खोटया नावाने सिमकार्ड घेवुन ते रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक येथे वापरुन खाते क्रमांक ०५४००१०००००४७०३ हा फिर्यादी यांचे मालकाचे नावाने खोटे अकाउंट उघडुन, त्यावर खोटे पासबुक व चेकबुक घेवुन त्याचा वापर करुन अमर मलाराम गेहलोत यांची जमीन ही महेश पाटील,लहु पाटील, अनंत पाटील यांची जमीन मिळकत त्यांचे मालकीची असल्याचे भासवुन तसा दस्तऐवज बनवुन त्यावर दुय्यम निबंधक कार्यालय अलिबाग येथे अशोक गणपत खाने यांची स्वाक्ष-या घेवुन फिर्यादी यांची फसवणुक केली.
अलिबाग पोलिस ठाण्यात २१०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम६१ (२), ३१८(४), ३३८, ३३६(३), ३३६(४), ३४०(२), ३३९, ३१९(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिपने हे करीत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.