अलिबाग विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडखोरीच्या पवित्र्यात, विद्यमान आमदाराची डोकेदुखी वाढणार

अलिबाग विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडखोरीच्या पवित्र्यात, विद्यमान आमदाराची डोकेदुखी वाढणार

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार म्हणून महेंद्र दळवी यांना निवडून आणण्याचे विढा महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी घेतले आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील लढतीकडे रायगड जिल्हासहित राज्याचे लक्ष वेधले आहे. अलिबाग विधान सभा मतदार संघात आमदारकी ची निवडणूक लढविण्यासाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष तथा विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांचे कट्टर समर्थक समजणारे तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटंमशेठ हे इच्छुक असल्याने ते बंड करणार असल्याने त्यांची उमेदवारी ही महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाने अलिबाग मुरुड विधान सभा मतदार संघाचा आगामी आमदार म्हणून दिलीप भोईर उर्फ छोटंमशेठ असतील अशी वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काही महिन्यांपूर्वी अलिबाग येथे आले होते तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीरपणे वक्तव्य केले होते.
अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदारसंघातील नेते दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ व त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह ७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. त्यानंतर त्यांच्यावर भाजप पक्षांच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी त्यांच्या पदाला मान देत अलिबाग मुरुड मतदार संघात भाजपच्या माध्यमातून अनेक विकास कामे करीत अनेकांचा पक्ष प्रवेश करून घेत या मतदार संघात भाजपची ताकद वाढविण्यातयशस्वी झाले.
दिलीप भोईर हे गेली २५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाला २००७ नंतर खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यांनी झिराड ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार निवडून आणून आपली सत्ता प्रस्थापित केली. गावकऱ्यांनी पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना व त्यांच्या समर्थकांना निवडून दिले. मतदारांचा विश्वास कुठेही ढळू न देता त्यांनी गावात विकासकामे केली. पुढे हाच विश्वास मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी सलग दोन निवडणुकांमध्ये दाखवला. २०१२ आणि २०१७ या दोन निवडणुकांमध्ये ते शेकापमधून निवडून आले, मात्र मागील काही महिने भोईर आणि शेकाप नेत्यांमध्ये दरी निर्माण झाली होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी दिलीप भोईर यांना दिलीप भोईर यांना अलिबागमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली जाईल अशी हमी त्यांना भाजपनेतृत्वाने दिली होती. मात्र त्याला फाटा देत त्यांनी डावलण्याचा प्रयत्नकेला आहे.
भारतीय जनता पक्षाने ऐन वेळी महायुतीमध्ये निवडणुक लढवायची असा निर्णय घेत असल्याने अलिबाग विधान सभा मतदार संघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांना उमेदवारी मिळण्याची आशा मावळत आली असल्याने त्यांना महायुती विरोधात बंडखोरी करीत विधान सभा निवडणुक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading