अलिबाग-रेवस मार्गावर मानी फाट्याजवळ बुधवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नवेदर बेली येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इनोव्हा कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, त्यामुळे दुचाकीवरील विश्वास पाटील (वय ४७) व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाटील दाम्पत्य अलिबागहून रेवसकडे जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
घटनेनंतर परिसरात संतप्त जमाव जमला होता. त्यांनी अपघातग्रस्त वाहनाची तोडफोड करत काही काळ वाहतूक रोखून धरली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अलिबाग पोलिसांनी अधिक फौजफाटा मागवून जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.