रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या अलिबाग पंचायत समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची घटना ताजी असतानाच अलिबाग पंचायत समिती मधील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात देखील नाना एकनाथ कोरडे,(कनीष्ठ सहायक रा. अलिबाग ता. अलिबाग, जि.रायगड), ज्योतिराम पांडुरंग वरुडे(- कनीष्ठ सहायक रा.मु. ताळशेत तळारोड, ता. माणगाव, जि. रायगड), महेश गोपीनाथ मांडवकर-(कनिष्ठ सहायक रा. मयूर बेकरीच्या मागे अलिबाग ता. अलिबाग, जि.रायगड) यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात निर्मला कुचीक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड अलिबाग यांनी फिर्यादी दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कार्यरत असताना नाना कोरडे यांच्याकडे त्याच्या कार्यालयातील कर्मचारी यांचे वेतन देयक तयार करण्याचे काम होते. नाना कोरडे , ज्योतिराम वरुडे, आणि महेश मांडवकर यांनी दिनांक जानेवारी २०२० ते डिसेबर २०२४ पर्यंत त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांचे वेतन देयकामध्ये वाढीव वेतन देयक म्हणुन एकुण ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ रु असा फरकाची बनावट वेतन देयक बनवुन सदरची रक्कम ही चाळविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे असलेला खाते क्र.२०३/३०५ येथे जमा असताना बाळविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती गीतांजली पाटील यांच्या खोट्या सहया बैंक चलनावर करून सदरची रकम्म त्यांच्या स्वतःच्या व इत्तर अशासकीय इसमाच्या वेगवेगळ्या खात्यावर घेवून अपहार केला व सदर ची बाब निदर्शना आली असता नाना एकनाथ कोरडे तत्कालीन कनीष्ठ सहायक यांनी त्यापैकी एकुण २ कोटी २३ लाख ५० हजार ६०० रु येवढी रक्कम बालविकास प्रकल्प अधिकार यांच्या कार्यालयाच्या नावे असलेला खाते क्र. २०३/३०५ यावर पुन्हा जमा करुन शासनाची दिशाभुल करून फसवणुक केली आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.33/2025, भारतीय न्याय संहिता 2023 318(4),316(5),344,336(2),338,336(3),340(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे हे करीत करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.