अलिबाग पोलीस ग्राउंड येथे आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोयनाड जवळील भाकरवड अंगणवाडीच्या चिमुकल्यांचा सहभाग

Aditi Tatkare Police Ground Alibag
पोयनाड (जीवन पाटील) : 
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील भाकरवड अंगणवाडीतील लहान मुलं व मुलींनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस ग्राउंड, अलिबाग येथे आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या नृत्यकलाविष्कार, वेशभूषा आणि प्रभावी भाषणांनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
या कार्यक्रमात भाकरवड अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पंडित जवाहरलाल नेहरू, अहिल्याबाई होळकर, भगतसिंग आणि भारतमाता यांच्या वेशभूषेतून विविध ऐतिहासिक व समाजप्रेरक पात्रांचे हुबेहूब सादरीकरण केले. या उपक्रमाचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, मदतनीस समिता पाटील, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना जाते.
कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बस्टेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत चिमुकल्यांनी आपल्या वेशभूषा आणि भाषण कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, मदतनीस समिता पाटील, तसेच पालक वर्गाने परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम एक संस्मरणीय क्षण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading