रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात एका 33 वर्षीय विवाहित महिलेची साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत विनयभंग केला असल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिनांक ३१/०३/२०२५ रोजी आरोपी विरोधात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात दिनांक ३१/०३/२०२५ रोजीदुपारी ०२.३० वाजण्याच्या सुमारास पीडित महीला ही मच्छिसाठी बर्फ घेवुन घराकड येत असताना त्यांच्या मागे त्याच गावातील आरोपी आला व त्याने साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या बाबतच्या गुन्ह्याची नोंद अलिबाग पोलिस ठाण्यात गु.रजि.नं.५८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७५,७६,७९ प्रमाणे दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उप निरीक्षक शिंदे या करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.