अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवार, दि. 22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पडणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली आहे.
ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथील नियोजन भवन सभागृहात पार पडणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची मानली जात असून, विविध सामाजिक घटकांना संधी मिळवून देण्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा पुढील आराखडा स्पष्ट होणार असून, ग्रामस्थ आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.