तालुक्यातील गोंधळपाडा रस्त्यावर बुधवारी पैशाचा पाऊस पडला. या पैशांचा मालक कोण हे समजले नाही मात्र यावेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची दिवाळी झाली. अवघ्या काही मिनिटात लाखो रुपये घेऊन वाटसरू पसार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दरम्यात कर्जत येथील एक्साइज् कार्यालयाची महिला कर्मचारी या रस्त्यावरून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शास आली, त्यांना देखील अडीच हजार रुपये मिळाले. ही रक्कम या तरुणीने अलिबाग पोलीस स्टेशनच्या मार्शल बिटकडे सुपूर्द केले आहेत.
अलिबाग जवळील गोंधळपाडा रस्त्यावर दुपारी तुरळक रहदारी सुरू होती. अचानक या रस्त्यावर पाचशे रुपयांच्या नोटा पासलेल्या दिसल्या. प्रत्यक्षदर्शिंच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या नोटांची मोठी रक्कम होती. या नोटा पाहून यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यानी या नोटा हातोहात लंपास केल्या.
दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या या नोटा निवडणुकीसाठी वापरल्या जाणार होत्या की, कुठल्या सामान्य माणसाची वर्षाची कमाई होती याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एखाद्याच्या पिशवीतून ही रक्कम पडली असावी, दिवाळीचा पगार किंवा कामगारांचा बोनस असू शकतो त्यामुळे ज्यांना कोणाला ही रक्कम मिळाली आहे त्यांनी अलिबाग पोलिसांकडे ही रक्कम सुपूर्द करून माणुसकी दाखवावी असेही म्हटले जात आहे.
या बाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर साले यांनी दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.