अलिबागमध्ये 1.5 कोटींची फसवणूक; आज दीड कोटींसह दोघे जेरबंद, आता पर्यंत पोलिसांसह एकूण 6 जण अटकेत

Raigad : जिल्ह्यात सण,उत्सव कालावधीकरिता मनाई आदेश जारी
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
अलिबाग येथे खाजगी नोकरी करणाऱ्या समाधान गणपत पिंजारी (वय 20) याने नागपूरच्या ज्वेलर्स नामदेव हुलगे यांना 7 किलो सोने कमी दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत 1.5 कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले. हुलगे यांनी सहकाऱ्यांसह पैसे गोळा करून अलिबागला जाण्याचे ठरवले.
योजनाबद्ध रीतीने समाधान पिंजारी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना पळस्पे येथे बोलावले आणि इनोव्हा गाडीत बसवले. यावेळी आरोपींनी बनावट पोलीस अधिकारी असल्याचा दिखावा करत बॅगा तपासण्याच्या बहाण्याने 1.5 कोटी रुपये असलेली इनोव्हा गाडी पळवली.
घटनेनंतर पोलिसांनी फिर्यादींना धमकावून तक्रार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादींनी रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. तपास सुरू होताच समाधान पिंजारी व दीप गायकवाड यांना अटक करण्यात आली. तसेच रायगड पोलीस कर्मचारी समीर म्हात्रे व विकी साबळे यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
सदर पोलिसांनी कसून चौकशी करून चोरी झालेली रक्कम हस्तगत करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आज समाधान पिंजारीचा भाऊ विशाल पिंजारी आणि इनोव्हा चालक अक्षय खोत (एमएच 01EA 1126) (दोघेही राहणार आटपाडी, सांगली) यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने  दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.
दरम्यान आता पर्यन्त रायगड पोलिस कर्मचार्‍यांसह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली असून सखोल तपास रायगड पोलिस करत आहेत .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading