अलिबागमध्ये बनावट सोने घोटाळ्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, आरोपींनी १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक करून पैसे लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी समाधान गणपत पिंजारी आणि त्याचा सहकारी दीप गायकवाड यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या कटात दोन पोलीस अंमलदारांचाही सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
घटनेचा थरार
१५ दिवसांपूर्वी समाधान पिंजारीने त्याच्या मूळगावातील व्यवसायिक नामदेव हुलगे यांना कमी किमतीत ७ किलो सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे नामदेव हुलगे यांनी आपल्या नातेवाईक ओमकार वाकशे यांना याची माहिती दिली. दोघांनी मिळून १ कोटी ५० लाख रुपये गोळा केले आणि ४ फेब्रुवारी रोजी अलिबागकडे रवाना झाले.
सदर इनोव्हा गाडी अटक आरोपी दीप गायकवाड हा चालवत होता. सदर गाडी पोयनाडच्या पुढे तिनवीरा डॅम येथे आली असता अटक आरोपी समाधान पिंजारी यांने सदर गाडी तिनवीरा डॅम येथे थांबिवले. त्यावेळी त्याने फिर्यादी व सहकारी यांना पुढे पोलीस चेकींग चालु आहे. व मी शंकर कुळे यास सोने घेवुन याच ठिकाणी बोलावितो असे सांगितले. त्यावेळी इनोव्हा चालक अटक आरोपी दीप गायकवाड यांने सदर इनोव्हा गाडी यू टर्न करून पनवेलच्या दिशेने तोंड करून उभी केली. त्यानंतर थोड्याच वेळात अटक केलेले पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी सुभाष साबळे हे गणवेशात मोटारसायकल वरून त्याठिकाणी आले. त्यावेळी गाडीत बसलेला अटक आरोपी समाधान पिंजारी यांने फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना पोलीस आले आहेत. गाडीच्या खाली उतरा असे सांगितले त्यावरून फिर्यादी व त्यांचे सहकारी पैशांच्या बॅगा गाडीतच ठेवुन खाली उतरले. त्याचवेळी सदर पोलीस अंमलदार उभ्या असलेल्या इनोव्हा जवळ जावुन इथे काय करत आहात. इथे मर्डर होतात व फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचे अंगझडती घेवु लागले वर त्यांना खिश्यामध्ये गांजा आहे काय, गाडीमध्ये कोण आहे, गाडी चेक करावी लागेल असे बोलुन गाडीजवळ गेले त्याचवेळी अटक आरोपी दीप गायकवाड हा अगोदरच इनोव्हा गाडी चालविण्यासाठी बसला होता. त्याने तात्काळ गाडी चालु करून सुसाट वेगाने पनवेलच्या दिशेने पैशासह गाडी घेवुन निघुन गेला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलीस अंमलदारानी गाडीचा पाठलाग करून पकडतो व त्यांना घेवुन येतो असे सांगुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी व सहकारी हे रोडने पायी पोयनाडकडे जात असताना गाडीचा पाठलाग करत गेलेले पोलीस अंमलदार पोयनाडकडुन अलिबागच्या दिशेने येताना दिसले. सदर अंमलदारानी फिर्यादीना पाहील्यानंतर रोड सोडुन कच्च्या रस्त्याने जंगलात निघुन गेले. त्यानंतर अटक आरोपी समाधान याने फिर्यादी यांना तो ज्या राजकीय नेत्याकडे मदत साठी गेला आहे त्यांचेच घरी पोलीसांची धाड पडुन तेथुन 7 किलो सोने व 6 कोटी रूपये जप्त केले आहे. पोलीस तुम्हाला पकडतील तुम्ही सर्वजण मोबाईल बंद करून निघुन जा. यावरून फिर्यादी व त्यांचे सहकारी यांनी त्यांचे मोबाईल बंद करून कामोठे येथे निघुन गेले.
पोलिसांचाही सहभाग
या प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झाला असून, बनावट तपासणी करणारे दोघे पोलीस – समीर म्हात्रे आणि विकी साबळे हेही या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादींना पोलिसी धाक दाखवून गाडीतून बाहेर काढण्याची आणि नंतर आरोपींना पैसे पळवून नेण्याची संपूर्ण योजना आखण्यात आली होती.
फिर्यादींचा पोलिसांकडे धाव
५ फेब्रुवारी रोजी पोलिस हवालदार हनुमंत सूर्यवंशी याने फिर्यादींना २ कोटी रुपये घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात येण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादींनी ७ फेब्रुवारी रोजी रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांची जलद कारवाई
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकांनी वेगाने तपास करून समाधान पिंजारी आणि दीप गायकवाड यांना ८ फेब्रुवारी रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर, पोलिसांनी या कटात सामील असलेल्या समीर म्हात्रे आणि विकी साबळे या दोन पोलीस अंमलदारांना अटक केली.
१.५ कोटींची रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू
अटक आरोपींकडे कसून चौकशी सुरू असून, चोरून नेलेली १ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.