अलिबागमध्ये घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

Gharafodi Alibag
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सुजलाम नगर येथील लंकेश भगवान नागावकर (वय ३८वर्षे,प्लँट.नं.201, फेज-2,अनुप्रभा कॉ. ऑप. हौउ सोसा.) यांच्या कडे घरफोडी होवून अज्ञात चोरट्याने रुपये ५ लाख९४हजार ७०० किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची तक्रार लंकेश नागावकर यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 30/11/2024 दि. 01/12/2024 दरम्यान मौजे लंकेश नागावकर यांचे राहते घरी प्लँट नं. 201, फेज -2, अनुप्रभा कॉ. ऑप. हौउ सोसायटी, सुजलाम नगर, पिंपळभाट,अलिबाग येथे फिर्यादी यांचे दि.30/11/2024 रोजी सांयकाळी 06.00 वा.ते दि.01/12/2024 रोजी सकाळी 08.00 वाजताचे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरी प्लँट.नं.201, फेज-2,अनुप्रभा कॉ. ऑप. हौउ सोसा, सुजलाम नगर, पिंपळभाट,अलिबाग येथे लंकेश नागावकर यांच्या घरात घरफोडी करीत अज्ञात चोरट्याने रु.१,२०,०००/- किमतीचा चार तोळे वजनाचे मंगळसुत्र,६०,०००/- किमतीचा दोन तोळे वजनाचां सोन्याचा हार,६०,००० /- किमतीच्या प्रत्येकी १ तोळे वजनाचे २ सोन्याच्या अंगठया,९०,००० /- किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या ६ चिप,१,०५,०००/- किमतीच्या साडे तीन तोळे वजनाच्या स ६ कानातळे जोड,१५,००० / किमतीची पाच ग्रॅम वजनाची नथ, ४५,०००/-किमतीच्या१.५ तोळे वजनाचेमुलीचे सोन्याचे कानातळे ५ जोड,१५,०००/-किमतीची पाच ग्रॅम वजनाची चैन, ५ ग्रॅम८२,०००/-रुपये रोख रक्कम,२०००/- किंमतीचे चांदीचे २ कॉईन,५०० /- किंमतीचे चांदीचे पैजण २ जोड,२००/-किंमतीचे चांदीचे जोडवी २ जोडअसा एकुण- ५,९४,७०० रूपये ऐवज बंद घराचे सेप्टी डोअरची कडी तोडून स्वत:चे फायदयाकरीता लबाडीच्या हेतुने लंपास केला आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 235/2024 BNS 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस उप निरीक्षक शिंदे ह्या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading