अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘यशश्री भगत’ची न्यायाधीशपदी निवड

Adv Yashashree Bhaga
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीची परीक्षा १८ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली होती. यात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील पंतनगर येथे राहणारी अ‍ॅड. यशश्री नल्लुरी भगत यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली आहे.
यशश्री भगत हिची राज्यात ११४ क्रमांकात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदी विराजमान होऊन ऐतिहासिक यशाला गवसणी घातल्याने हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशश्री भगत हिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण अलिबाग शहरातील सेंट मेरी स्कूल मध्ये तर बारावी (वाणिज्य) शिक्षण अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात पूर्ण केले.तर मुंबई येथील अमीटी युन्व्हरसिटी येथून बी .ए. एल एल बी चे शिक्षण घेतले . तसेच अजिंक्य डी वाय पाटील पुणे येथे एल एल एम पूर्ण केले आहे.
यशश्री भगत या अलिबागमधील पंतनगर येथील रहिवासी आहेत. आपल्या जिद्दी व मेहनतीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. वकील क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी न्यायाधीश होण्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न त्यांनी प्रचंड मेहनतीने प्रत्यक्षात उतरविले आहे.
2022 मध्ये 114 जागा भरण्यासाठी आयोगाकडून जाहीरात प्रसिद्ध झाली होती. साधारणतः 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षा दिली होती. त्यातून 1 हजार 200 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
मुंबईतील न्यायालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अंतिम टप्पा यशश्री हिने यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यात विद्यार्थ्यांची थेट मुलाखतीसाठी निवड झाली. अ‍ॅड. यशश्री भगत यांनी यामध्ये घवघवीत यश मिळवून त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून निवड करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी वरिष्ठ वकील गणेश शिरसाठ व वकिली व्यवसायात मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असणारी मोठी बहीण यांचे वेळोवेळी मिळालेले मोलाचे मार्गदर्शन आणि आई-वडीलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी यश प्राप्त केल्याचे सांगितले आहे.
————————————————-
माझी मोठी बहीण देखील वकील आहे. ती मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. म्हणूनच मला कायदेशीर क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि मी कायद्याचा अभ्यास केला.
…अ‍ॅड. यशश्री नल्लुरी भगत
————————————————-
अ‍ॅड. यशश्री नल्लुरी भगत यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2022मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या हस्ते यशश्री भगत यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading