अपघातात जखमी युवकाची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरीला; गुन्हा दाखल

police
पनवेल :
पनवेल–करंजाडे येथील जुन्या टोल नाक्याजवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात एक मोटारसायकलस्वार जखमी झाला असून, अपघातानंतर त्याच्यासोबत असलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरी झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अजय माळवकर (वय ३९, रा. कांदिवली) हे आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना करंजाडे जुन्या टोल नाक्याजवळील डिव्हायडरला धडकले. या अपघातात त्यांना लहान-मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने उपचारासाठी अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल करण्यात आले.
अपघातावेळी त्यांच्या बरोबर एक बॅग होती. त्या बॅगेत कपडे तसेच ३ अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या२ तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट असा एकूण अंदाजे १.२५ लाख रुपये किमतीचा ऐवज होता. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर ही बॅग त्यांना मिळाली नाही.
त्यामुळे बॅग चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करत पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत असून, आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading