सावित्री नदीपात्रातून अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांनी महाड तालुक्यात उच्छाद मांडला असून महाड तालुक्यातील मुठवली गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा अनधिकृत वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने बळी घेतल्याची घटना घडल्याने मुठवली गावातील शेतकरी आक्रमक झाले असून अनधिकृत वाळू डेपो बंद करण्याची मागणी मुठवली गावातील ग्रामस्थांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाड तालुक्यात सावित्री नदीपात्रात मागील महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन चालू आहे याबाबत अनेक ग्रामस्थ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधी मार्फत तहसीलदार व महाड प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करूनही कोणती कारवाई होत नसल्याने अखेर एका शेतकऱ्याचा बळी जाण्याची घटना आज सकाळी दहा च्या सुमारास घडली
मुठवली गावातील शेतकरी रामचंद्र तुकाराम डावरुंग वय वर्ष 80 हे आपल्या शेतात काम करीत असताना स्वतःच्या मालकीच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांच्या शेताजवळ असणाऱ्या अनधिकृत वाळू वाहतूकदारांच्या डेपो मधून एम .एच. 06. बिडी .23 23. या क्रमांकाच्या डंपर मधून अनधिकृत रेती वाहतूक होत असताना या डंपर चालकाने डंपर पुढे नेऊन वळवण्याच्या ऐवजी रिव्हर्स टाकून वळवत असताना पाठीमागे विहिरीवर पाणी भरणाऱ्या रामचंद्र तुकाराम डावरुंग या शेतकऱ्याला डंपर खाली चिरडण्याचा प्रकार करून डंपर चालक व क्लिनर हे फरार झाल्याची घटना मुठवली जवळील वाळू डेपोवर घडली.
मुठवली गावातील रामचंद्र तुकाराम या शेतकऱ्याचा स्वतःच्या शेतात अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने चिरडून बळी गेल्याची घटना मुठवली गावात समजतात ग्रामस्थांनी महाड तुढील रस्ता रास्ता रोको करून काही काळासाठी बंद केला ही घटना समजतात महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी व तहसीलदार महेश शितोळे हे या ठिकाणी हजर झाले व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
महाड तालुक्यातील मुठवली गावाजवळ शासनाचा अधिकृतरित्या वाळू डेपो आहे. मात्र सावित्री पात्रातून काढलेला रेजगा साठवण्यासाठी सावित्री पात्रातून काढण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला आहे त्याने वारंवार रामचंद्र तुकाराम डावरुंग या मयत शेतकऱ्याकडे सदरच्या शेतातील मोकळी जागा वाळू साठवण्यासाठी मागितली होती मात्र त्यांनी वारंवार या गोष्टीला विरोध केला होता या विरोधामुळेच अखेर डावरुंग यांचा बळी घेतला गेला असल्याची चर्चा यावेळी जमलेल्या लोकांमध्ये चर्चिली जात होती
याबाबत महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता तर रामचंद्र तुकाराम डावरुंग या मयत शेतकऱ्याचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.