अधीक्षक कार्यालयात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीशी चर्चा : मागण्या मान्य न केल्यास आंदोलनावर समिती ठाम

Matheran Baithak
माथेरान (मुकुंद रांजणे) : 
माथेरानच्या पर्यटनाला दस्तुरी नाका येथे पर्यटकांची दिशाभूल त्याचप्रमाणे नेरळ येथे ओला ,,उबेर ,मेरू या वाहनांची पाचशे रुपयांची पावती अवैधरित्या वसुली केली जाते यासाठी पर्यटन वाचविण्यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने दि.१९ फेब्रुवारी रोजी असेंबली हॉलच्या प्रांगणात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार सर्वानुमते संबंधीत अधिकारी वर्गाला निवेदन देऊन इथले पर्यटन वाचले पाहिजे याकामी विस्तृतपणे चर्चा करण्यात आली होती त्याप्रमाणे  दि.२७ रोजी अधीक्षक कार्यालय, मुख्याधिकारी, वनखाते, पोलीस ठाणे येथे जाऊन निवेदन देण्यात आले होते. त्यावरून आज दि.६ रोजी अधीक्षक कार्यालयात या समितीच्या शिष्टमंडळाशी साधकबाधक चर्चा करण्यासाठी अधीक्षक यांनी बोलावले होते.
यावेळी अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे,वनपाल राजकुमार आडे, पोलीस निरीक्षक अनिल सोनाने यांसह माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, उबाठा गटाचे शहरप्रमुख कुलदीप जाधव,माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, काँग्रेस अध्यक्ष विजय कदम, व्यापारी संघटना सदस्य ज्ञानेश्वर बागडे,हॉटेल असोसिएशनचे उमेशभाई दुबल, रिक्षा संघटना सचिव सुनील शिंदे,चर्मकार समाज अध्यक्ष नितेश कदम,पत्रकार संघटना अध्यक्ष गिरीश पवार यांसह अन्य उपस्थित होते.
या चर्चा सत्रामध्ये शिष्टमंडळाने पर्यटन वाढीसाठी नेरळ गेटवर ओला, उबेर या वाहनांची पाचशे रुपयांची अवैधरित्या वसुली केली जाते ती ताबडतोब बंद करावी, दस्तुरी पार्किंग मध्ये घोडेवाले, रिक्षावाले असोत किंवा हमाल, रूम एजंट यांना बंदी करण्यात यावी, मालवाहतूक घोड्याची शनीवार रविवार यादिवशी जीवनावश्यक वस्तू वगळता इमारत साहित्य आणण्यासाठी वाहतूक बंद करावी, जागोजागी घोडा, ई रिक्षा हमाल यांचे दरपत्रक लावावेत, प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि दस्तुरी नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात असावा जेणेकरून कुणीही पर्यटकांची दिशाभूल करून फसवणार नाही. या मागण्या नमूद केल्या.
————————————————————————
माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर आम्ही घोडेवाले, एजंट, हमाल यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना देऊ.
…सुरेंद्रसिंग ठाकूर—-अधीक्षक माथेरान
——————————————————————–
घोडा ,रिक्षा, हमाल यांचे दरपत्रकाचे बॅनर  लावण्यात येतील. शक्यतो पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वार मधून प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले जातील.यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
…राहुल इंगळे –मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद
————————————————————————
पर्यटकांच्या गाडीच्या मागे कुणीही घोडेवाले, एजंट वगैरे धावणार नाही यासाठी लक्ष केंद्रित करून जो कोणी नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
…अनिल सोनाने—पोलिस निरीक्षक माथेरान
————————————————————————–
आमच्या शिष्टमंडळाच्या ज्या काही पर्यटनाच्या दृष्टीने गावाच्या हिताच्या मागण्या केल्या आहेत त्यांची पूर्तता काही दिवसांत झाली नाही तर आम्ही दि.१८ मार्च पासून माथेरान बेमुदत बंद करणार आहोत त्यासाठी आमच्या सोबत हॉटेल असोसिएशन,आणि समस्त पर्यावरण प्रेमी नागरिक सुध्दा आहेत.आमच्या ह्या शिष्टमंडळात राजकारण वगैरे काही नाही. गावाच्या हितासाठी येथील सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य केले आहे.
…मनोज खेडकर— माजी नगराध्यक्ष माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading