अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या वतीने ग्राम पंचायत दिघी येथे केंद्र स्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण १० शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावचे प्रथम नागरिक सरपंच विपुल गोरीवले, उपसरपंच गोपाळ मेंदाडकर,ग्राम पंचायत सदस्या निर्मला कांदेकर, दिघी कोळी समाज अध्यक्ष प्रकाश गोवारी, अनंत मेंदाडकर, अदानी फाउंडेशनच्या जयश्री काळे, अवधूत पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दिघी मराठी विकी मेंदाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मणेरी नानवली भालचंद्र भोपी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हरवित मराठी ललित पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दिघी उर्दू लतिफ चोगले, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सर्वे मराठी केतन चव्हाण, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सर्वे उर्दू फरीद मुकादम, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कुडगाव मराठी जगन्नाथ खरगावकर, सर्व शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिघी केंद्र प्रमुख परशुराम बिराडी यांनी केले. या कार्यक्रमाला ग्राम दिघी कुडगाव, सर्वा , हरवीत, मनेरी नानवली, करलास येथील १० शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिघी कोळी समाज अध्यक्ष प्रकाश गोवारीकर हे होते.
दोन दिवसीय कार्यक्रम मध्ये समूह गीत, पारंपरिक नृत्य स्पर्धा, आणि ज्वलंत मुद्द्यांवर पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मणेरी नानवली यांनी सर्वाधिक बक्षिसे पटकावली.
क्रिडा स्पर्धा मध्ये लगोरी, बेचकी ने नेम धरणे, शिल्प कला, लंगडी, दोरी उड्या आदि खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांशी निगडित सर्व खेळ उत्साह वर्धक होते. विशेष मार्गदर्शन वडवली शाळा शिक्षक शेखर बोरकर यांनी या स्पर्धेत दिले.
कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सरपंच विपुल गोरीवले आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी वाडी हरवित चे विद्यार्थी यांचा सहभाग अविस्मरणीय होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामसखी नम्रता दिघीकर व प्राजक्ता आडूळकर यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.