
वेळास आगर ( संतोष शिलकर ) :
भारत देश हा कृषि प्रधान देश असून विविध संस्कृती ने नटलेला आहे. त्याचे संरक्षण हे आपल्या हातात आहे. त्याच प्रमाणे उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार आवश्यक आहे. कोकण फिरायला जायचं म्हटलं विवीध रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात आणि ग्रामीण कुटुंब त्याचे पुरेपूर सेवन करतांना आढळतात. ह्याबद्दल विशेष जनजागृती करणे तसेच भरड धान्य आणि कडधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी अदानी फाउंडेशन प्रयत्नशील आहे.
राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम ग्राम पंचायत वडवली येथे आगरी भंडारी समाज भवन येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना श्रीवर्धन अमिता भायदे, प्रशासक भरत कुबेर,अदानी फाउंडेशन डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
जयश्री काळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतांना पोषणाचे महत्त्व पटवून देत दैनंदिन जीवनात कुटुंबाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महिलेची भूमिका आणि चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. आपले जेवणाचे ताट नेहमी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व आणि प्रथिनांची गरज भागवणारे असायला पाहिजे.
अमिता भायदे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम महिनाभर कसा साजरा करायचा आहे. याबद्दल विस्तृत माहिती दिली. अंगणवाडी ला”एक पेड मां के नाम” हा कार्यक्रम सुद्धा राबवायचा आहे. वेगवेगळ्या थिम नुसार कार्यक्रम घेणे आहे.
भरत कुबेर यांनी निसर्गाने आपल्याला खूप मोठे वरदान दिलेले आहे आणि गणपती उत्सव विविध कलागुणांना नटलेला आहे. हिरव्या पालेभाज्या आपल्याला यांदिवसांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. अंगणवाडीतील सकस आहार पौष्टिक दृष्ट्या योग्य असतो. उघड्यावरचे पदार्थ पासून लहान मुलांना दूर ठेवा. आई वडिलांना यात विशेष भूमिका घ्यावी लागेल. संतुलित आहार हा सुदृढ आरोग्याचा पाय आहे. असे आपल्या शब्दात सांगितले.
अंगणवाडी कर्मचारी आणि वडवली गावातील महिलांसाठी पौष्टिक आहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम, द्वितीय तृतीय आणि प्रोत्साहन बक्षीस देऊन महिलांना गौरवांवित करण्यात आले. सर्व महिला स्पर्धकांनी यात मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अदानी फाउंडेशन चे अवधूत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.ग्राम सखी अरुंधती पिलंकर यांनी गावातील महिलांना एकत्रित आणण्यामध्ये विशेष भूमिका बजावली.