श्रीवर्धन तालुक्यातील अदाणी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून मासिक पाळी व्यवस्थापन शुक्रवार दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यक्रम पार पडला. या वेळी मासिक पाळीचा मुलींच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. यामुळे स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. धक्काधक्कीचे आयुष्य, अभ्यासाचा ताण इत्यादी गोष्टींमुळे मुलींना व महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ह्यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी निर्णय फाऊंडेशन च्या संगीता बालोदे यांच्याकडून विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
मासिक पाळी व्यवस्थापन आणि स्वच्छते बाबत जनजागृती करणे, जुन्या रुढी आणि परंपरा यावर अवलंबून न राहता नवीन आधुनिक वातावरण आणि त्यावर प्रभावी उपाय,त्याचप्रमाणे किशोर वयीन मुलींसाठी पौष्टिक आहार, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण ह्या सर्व गोष्टी मुलींच्या शारीरिक बदला साठी कारणीभूत असतात.दिघी गावातील कोळीवाड्यातील मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखली नाही तर जंतू संसर्ग होणे,खाज सुटणे,इत्यादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखली तर योनीमार्ग, मूत्र मार्गातील संसर्ग, यीस्ट संसर्ग टाळल्या जाऊ शकतात त्यामुळे संभाव्य होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करू शकतो.
या कार्यक्रमाचे आयोजन दिघी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले शाळा,पी एन पी हायस्कूल वडवली,रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा वडवली,दिघी कोळीवाडा महिला वर्ग त्याचप्रमाणे द. ग. तटकरे हायस्कूल विरझोली येथील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी करण्यात आले. एकूण ४०२ मुलींनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा वडवली मुख्याध्यापिका पूजा मुरकर, पी. एन. पी. हायस्कूल वडवली शिक्षिका नितिशा मोकल,सुवर्णा डोळस,वडवली आगरी समाज महिला उपाध्यक्षा उज्वला बिराडी, विरझोली शाळेचे मुख्याध्यापक मार्गे सर,अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले शाळा दिघी येथील शिक्षिका ममता सोनवणे, शलाका पाटील,अश्रफी नदाफ,वंदना माने उपस्थित होते. अदाणी फाऊंडेशन च्या जयश्री काळे यांनी पोषण कार्यक्रम अंतर्गत अदाणी फाऊंडेशन मार्फत असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अदाणी फाऊंडेशन चे अवधूत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. ग्राम सखी नम्रता दिघीकर आणि अरुंधती पिळणकर यांनी जनजागृती साठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमा मुळे किशोरी वयातील मुलींमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.अदाणी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरातील आरोग्यविषयक जनजागृती वाढत असून, भविष्यात असे अधिकाधिक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मासिक पाळीचा मुलींच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. यामुळे स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. धक्काधक्कीचे आयुष्य, अभ्यासाचा ताण इत्यादी गोष्टींमुळे मुलींना व महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ह्यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी निर्णय फाऊंडेशन च्या संगीता बालोदे यांच्याकडून विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
मासिक पाळी व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, जुन्या रुढी आणि परंपरा यावर अवलंबून न राहता नवीन आधुनिक वातावरण आणि त्यावर प्रभावी उपाय, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींसाठी पौष्टिक आहार, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण ह्या सर्व गोष्टी मुलींच्या शारीरिक बदलासाठी कारणीभूत असतात. दिघी गावातील कोळीवाड्यातील मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखली नाही तर जंतू संसर्ग होणे, खाज सुटणे, इत्यादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखली तर योनीमार्ग, मूत्र मार्गातील संसर्ग, यीस्ट संसर्ग टाळल्या जाऊ शकतात त्यामुळे संभाव्य होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करू शकतो.
या कार्यक्रमाचे आयोजन दिघी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले शाळा, पी एन पी हायस्कूल वडवली, रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा वडवली, दिघी कोळीवाडा महिला वर्ग त्याचप्रमाणे द. ग. तटकरे हायस्कूल विरझोली येथील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी करण्यात आले. एकूण ४०२ मुलींनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा वडवली मुख्याध्यापिका पूजा मुरकर, पी. एन. पी. हायस्कूल वडवली शिक्षिका नितिशा मोकल, सुवर्णा डोळस, वडवली आगरी समाज महिला उपाध्यक्षा उज्वला बिराडी, विरझोली शाळेचे मुख्याध्यापक मार्गे सर, अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले शाळा दिघी येथील शिक्षिका ममता सोनवणे, शलाका पाटील, अश्रफी नदाफ, वंदना माने उपस्थित होते. अदाणी फाऊंडेशन च्या जयश्री काळे यांनी पोषण कार्यक्रम अंतर्गत अदाणी फाऊंडेशन मार्फत असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अदाणी फाऊंडेशन चे अवधूत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. ग्राम सखी नम्रता दिघीकर आणि अरुंधती पिळणकर यांनी जनजागृती साठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे किशोरी वयातील मुलींमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. अदाणी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरातील आरोग्यविषयक जनजागृती वाढत असून, भविष्यात असे अधिकाधिक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.