पेण, वडखळ, वाशी, शिहू विभागातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवतील या हेतूने आम्ही मागील निवडणूकीत रवीशेठ पाटील यांना निवडून दिले होते, परंतु रवीशेठ पाटील यांनी एकही विधायक काम केले नाही. अतुल म्हात्रे हेच खरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. अतुल म्हात्रे हे उच्चशिक्षित व स्वच्छ चारित्र्याचे आहेत. ते स्थानिक भूमिपुत्र व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता कटिबद्ध असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. त्याचप्रमाणे सुज्ञ मतदारांनी अतुल म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून विधानसभेत पाठवावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
गडब परिसरात नियोजित MIDC करिता जमीन अधिग्रहण करताना शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही या प्रकल्पामुळे येथील शेतकरी विस्थापित होणार आहे. शेकाप नेते भाई जयंत पाटील यांनी MIDC च्या विरोधात आंदोलन केले व प्रकल्प थांबविला. विद्ममान आमदार रवीशेठ पाटील यांनी या विषयी कोणतीही भुमिका घेतली नाही. शेतकऱ्यांशी साधा संवादही साधला नाही. त्यामुळे गावागावात त्यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. ते वयोवृद्ध झाले आहेत. रात्री बेरात्री कोणाच्याही मदती करीता ते धाऊ शकत नाहीत. महायुतीतील रिपब्लिकन पक्षाने सुद्धा रवीशेठ पाटील यांचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतला आहे. हि वस्तुस्थिती असल्याने आता जनतेला तरुण तडफदार आमदार हवा आहे. त्यासाठी अतुल म्हात्रे हे एकमेव योग्य उमेदवार आहेत.
प्रसाद भोईर पहिले शेकाप मध्ये होते नंतर भाजप आणि अत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत. दल बदलू अशी त्यांची प्रतिमा झाल्याने प्रसाद भोईर यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. ते खरे कोणत्या पक्षाचे असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक युवकांना रोजगार मिळावा या मागणी करिता जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा काढला होता. परंतु त्या आंदोलनानंतर आजपर्यंत स्थानिक युवकांना जेएसडब्ल्यू कंपनीत नोकऱ्या मिळाल्याच नाहीत. प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने शिशिर धारकर यांनी सुद्धा विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा विश्वास नसेल त्यांच्यावर जनता काय भरवसा ठेवणार ? असा सवाल जांभळे यांनी यावेळी उपस्थित केला.
अतुल म्हात्रे यांना काराव, शिहु , कासु, वडखळ, वाशी प्रभागातुन १ नंबरची मते देऊन भरघोस मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही संजय यांनी यावेळी दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.