अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळील लव्हाळी येथील भव्य प्रांगणात दिनांक २४,२५,२६,जानेवारी २०२५ या तीन दिवसात महा आदिवासी महोत्सव मनोरंजन, ज्ञान, आणि प्रबोधन हि त्रिसूत्री अंगीकरून आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आयोजित आदिवासी महोत्सव लव्हाळी २०२५ ला झाला.महामेळा,महाकला,महाखेळ,महासंस्कृति,महास्वाद,महाव्यवसाय,आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य बदलापूर लव्हाळी येथे अवतरली होती.
आदिवासी संस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन घडवणारे आदिवासी नृत्य,मराठ्यांची गौरवगाथा,मायमराठी, लोककला,उत्सव महालावणी उत्सव.अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आदिवासी महोत्सव अंतर्गत उत्पादनाचे प्रदर्शन तसेच विक्री करणारे छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांनी आपली दुकाने,आकाशी पाळणी, लावण्यात आली होती. महाकला उपक्रमांद्वारे मनोहारी दर्शन घडवणारे गोंधळ,जागरण,भारुड, आदिवासी कला,यांचे दर्शन घडवण्यासाठी १०० हुन अधिक पारंपरिक कलावंत या आदिवासी महोत्सवात सहभागी झाले होते.”महास्वाद ” अंतर्गत वैविध्यपूर्ण रूचकर पदार्थांवर खवय्यांनी ताव देखील मारला.”महाव्यवसाय ” अंतर्गत विविध व्यावसायिक एकत्र आले होते.”महागौरव” विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा गौरव तसेच विविध आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला. आदिवासी महोत्सव भव्य खुल्या रंगमंचावर साकारण्यात आला होता. सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले होते.
या आदिवासी महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द “आदिवासी संस्कृती”जगदिश पाटील, युटूबबर,”आदिवासी लोककला”सुरेखा पुणेकर,विनोद कुमावत, “बॉलीवुड नाईट”गौतमी पाटील,सचिन कुमावत, यांचे विशेष कार्यक्रम आयोजित केले होते.या आदिवासी महोत्सवासाठी अनेक तालुक्यातून आदिवासी समाज इतर लोकांनी आपली उपस्थितीत दाखवली होती. आदिवासी महोत्सव वामन म्हात्रे फाऊंडेशन आणि विकास संघटना अंबरनाथ आयोजित लव्हाळी येथे करण्यात आला होता.
आयोजक वामन म्हात्रे फाऊंडेशन,वामन म्हात्रे,ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भगत,ठाणे जिल्हा सचिव विलास हिंदोळा,अंबरनाथ तालुका अध्यक्ष रामदास शिंगवा,अंबरनाथ तालुका सचिव तुकाराम वाघ, उपाध्यक्ष सुभाष हंबीर, जगन आघाण,सुनिल शेंडे,हनुमान बांगारा, प्रकाश जावळे,शिवाजी आघाण,सुकऱ्या हंबीर, प्रकाश सराई,कुंदन आघाण,संपूर्ण आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका कमिटी आदिवासी क्रिडा असोसिएशन अंबरनाथ आणि लव्हाळी ग्रामस्थ.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.